इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे शनिवारी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. परस्र हिताच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी ते सौदीच्या दौर् यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान झाल्यापासून हा त्यांचा पहिलाच विदेश दौरा असून ते व्यवसायिक विमानातून सौदीला रवाना झाले आहेत.
शाहबाज शरीफ हे गेल्या महिन्यात दुसर् यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत. पंतप्रधान झाल्यापासून देशाची आर्थिक व्यवस्था सुरळ्ती करण्याचे महत्वाचे आव्हान त्यांच्या समोर आहे.
त्याचसाठी सौदी आणि अन्य देशांची मदत मागण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे. शाहबाज शरीफ यांच्या समवेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दर, संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ आणि अन्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही सौदीच्या भेटीवर गेले आहेत.
याशिवाय पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज या देखील पंतप्रधानांच्या समवेत सौदी अरेबियाच्या दौर् यावर गेल्या आहेत. आपल्या या भेटीदरम्यान शाहबाज शरीफ हे मक्का आणि मदिनाची यात्रा देखील करणार आहेत. रमजातन महिना संपत असतानाच त्यांची ही यात्रा होणार आहे.
या भेटीदरम्यान शाहबाज शरीफ हे सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांचीही भेट घेणार असून त्यांच्याशी परस्पर सामंजस्याच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत. प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर दोन्ही नेते आपली मते मांडणार आहेत.
या भेटीदरम्यान विविध विकास प्रकल्पांची निश्चिती देखील केली जाणार आहे. कृषी क्षेत्रासह अन्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांमधील सहकार्याच्या प्रकल्पांना मंजूरी देखील दिली जाणार आहे. पाकिस्तानमधील रेको दिक प्रकल्पामध्ये सौदी अरेबिया एक अब्ज डॉलरची गुतवणूक करण्याचीही शक्यता आहे.