इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबीची जवळची मैत्रीण फराह खान देश सोडून परदेशात पळून गेली आहे. पाकिस्तानात नवे सरकार स्थापन झाल्यास तिला अटक होऊ शकते, अशा बातम्या येत आहेत.
फराह खान पाकिस्तानातून जवळपास ९० हजार डॉलर घेऊन पळून गेली आहे. त्यांचा विमानात बसलेला एक फोटोही व्हायरल झाला आहे.
फराह खान रविवारी दुबईला रवाना झाली आणि तिचा पती एहसान जमील गुजर आधीच अमेरिकेला गेला आहे. अधिकार्यांच्या बदल्या आणि त्यांना इच्छित पद मिळवून देण्यासाठी फराहने मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या उपाध्यक्षा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी दावा केला की फराहने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून हा भ्रष्टाचार केला आहे. मरियमच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडल्यास त्यांची “चोरी” पकडली जाईल, अशी भीती वाटते.
Farah Khan. The bag with her is for $90,000. Yes that’s ninety thousand dollars. #pti pic.twitter.com/SL6Xg3wkaL
— Fahad Marwat (@fahad_marwat) April 4, 2022
पंजाबचे नुकतेच बडतर्फ केलेले राज्यपाल चौधरी सरवर आणि इम्रान खान यांचे जुने मित्र आणि पक्षाचे फायनान्सर अलीम खान यांनीही फराहने पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्यामार्फत बदल्या आणि पोस्टिंगद्वारे कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप केला आहे.