मुंबई – काही समुद्री जीव मानवी विचाराच्या पलीकडेच असतात. समुद्री जीवांमध्ये काही माणसाला फायद्याचे असतात तर काही जीवघेणे असतात. असाच एक समुद्री जीव आहे पाकू मासा.
या मासाचे दात माणसासारखे असून या मासाचे डोळे आणि जबडा सुद्धा माणसा सारखा असतो. काळ्या, लाल रंगाचा हा मासा असतो. सध्या सोशलवर या मासाचे फोटो शाळेचं व्हायरल झाले आहे. या फोटोवर युजर्सद्वारे वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात आले आहे.
याबाबत वृत्तमाध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार हा मासा अॅमेझॉन नदीत आढळत असून ह्याचे नाव पाकू माझा आहे. अॅमेझॉन नदी व्यतिरिक्त हा मासा दक्षिण अमेरिकेसह ब्राझील, स्कँडेनेव्हीया, पॅरीस, ओशिनिया या भागातही हा मासा आढळतो.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील डेलरान सिटीतील एका तलावात मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला हा मासा सापडला. त्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जगभरात अनेक ठिकाणी नद्यांमध्ये, तलावामध्येही हा मासा आढळल्याचं समजत आहे. पिरान्हाच्या जातकुळीतील हा मासा त्याच्या तुलनेत थोडा कमी धोकादायक आणि शांत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नॅशनल जिओग्राफिकनं दिलेल्या माहितीनुसार, हा मासा मानवी अवयव खातो. हा मासा स्त्री, पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट खात असल्याचं उघड झालं आहे. डेन्मार्कमध्ये एका व्यक्तीचं गुप्तांग या माशानं खाल्ल्याचेही त्यांनी सांगितले आहे.