पिंपरी : वृक्षारोपणासारखे उपक्रम आपण सर्वांनी राबवले आणि आपले शहर फळा-फुलांनी बहरून गेले तर पिंपरी चिंचवड शहराला कुठेही ऑक्सिजन कमी पडणार नाही, असे मत महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीतर्फे 25 वे फुले, बागा, भाजीपाला, फळे, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन 22 ते 24 फेब्रुवारी 2020 या कालावधीत महापौर निवासस्थान प्राधिकरण, निगडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्या शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, कमल घोलप, विनया तापकीर, नगरसदस्य दत्तात्रय साने, राजू मिसाळ, अमित गावडे, संदीप वाघेरे, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य संभाजी बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त उद्यान अधीक्षक दादाभाऊ पवार, उद्यान अधीक्षक डी. एन. गायकवाड, पी. एम. गायकवाड, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथीयान, पर्यावरण संवर्धन समितीचे डॉ. विकास पाटील, सामाजिक कार्यकर्ते हिरामण भुजबळ, विरोबा गुजर उपस्थित होते.
महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने कारखानदार, शासकीय व इतर संस्था, हॉटेल, लग्नकार्यालय, रोपवाटिका यांच्या तसेच खासगी बंगला बाग, स्वच्छ सुंदर टेरेस गार्डन, मनपा शाळा, खासगी शाळा, गृहरचना संस्था यांच्या नुकत्याच फुले, बागा, भाजीपाला, फळे, वृक्षारोपण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
पार पडला.