नगर – घरातील किरकोळ वादातून विवाहितेला मारहाण केल्याची घटना भिंगारमधील सौरभनगर परिसरात रविवारी (दि.23) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून पती विनायक मोहन शेलार, सासू कमल मोहन शेलार, भाया गणेश मोहन शेलार (सर्व रा. सौरभनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहित महिला सकाळी घरासमोर ओलणीवर कपडे वाळत घालत असताना त्यांच्या सासूने वाळत घातलेले कपडे खाली टाकले. तेव्हा विवाहित महिला सासूला म्हणाली, कपडे खाली का टाकले’. असे म्हटल्याचा राग आल्याने सासूने विवाहितेला शिवीगाळ केले. तर, नवऱ्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून विवाहितेला जखमी केले. तर, भायाने फोनवरून शिवीगाळ केली. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.