नगर – पाईपलाईन रस्त्यावरील मेघराज हॉटेलची सात ते आठ जणांनी रात्री तोडफोड करून हॉटेल मालकाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण गिते यांनी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी योगेश उर्फ सोनू पोटे, रामदास आजबे, सोन्या लोखंडे,अक्षय बाभूळके, आदित्य घोलप सह इतर तीघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाब मिळालेली माहिती अशी की, 15 जानेवारीला हॉटेल मालक गिते व पोटे यांच्यात किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर या तिघांविरोधात गितेंनी तोफखाना पोलिसांत तक्रार केली होती. याच कारणावरून रात्रीचा प्रकार घडला.
पोलिसांत तक्रार दिली म्हणून आदित्य घोलप याच्यासह तीन-चार साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून सामानाची तोडफोड करून नासधूस केली.
तसेच लाकडी दांडके व तीक्ष्ण हत्याराने हॉटेलचालकाला मारहाण करण्यात आली. याबाबत मारहाण करून, हॉटेलचे नुकसान यसेच दहशत केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.