कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. यंदाचा हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या सोहळ्याचं यंदाचं ९२ व्या वर्ष होते.
दरम्यान, यावेळी रेड कार्पेटवर हॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. एकापेक्षा एक ग्लॅमरस, स्टाईलिश अंदाजात हॉलिवूड कलाकारांनी रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. पण सर्वाधिक लक्ष वेधले ते म्हणजे, अभिनेता आणि गायक ‘बिली पोर्टर’ने.
यावेळी बिली पोर्टरने बटरफ्लाय डिझाईनचा बॉलगाऊन, त्यावर हिल्सच्या सँडल, डोळ्यावर गॉगल अशा अतरंगी अवतारात तो रेड कार्पेटवर अवतरला आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. त्याचा हा लूक रॉयल्स प्रेरित होता. मात्र, यावेळी बिली या लूकमध्ये अतिशय कॉन्फिडन्स दिसला. सध्या त्याचा हा लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Check out these royal accessories, y’all! ? Thank you to all of the brilliant artisans and designers who made tonight’s #Oscars red carpet custom @gilesgilesgiles look complete.?@Santiagofelipe pic.twitter.com/GzBmEsYDEN
— Billy Porter (@theebillyporter) February 10, 2020