नवी दिल्ली – ऑस्कर पुरस्काराकडे कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्या देखील हातात असावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. भारतासाठी यंदाचा हा सोहळा खूप खास ठरला आहे.
याच कारण म्हणजे ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच, यावेळी गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांनी ऑस्करच्या मंचावर ‘नाटू नाटू’ गाणं जबरदस्त परफॉर्मन्स देखील केलं. तर दुसरीकडे ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या शॉर्टफिल्मला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे. या कामगिरीमुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘आरआरआर’ चित्रपटाच्या टीमचं आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’चं कौतुक केल्याचं दिसून आलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Exceptional!
The popularity of ‘Naatu Naatu’ is global. It will be a song that will be remembered for years to come. Congratulations to @mmkeeravaani, @boselyricist and the entire team for this prestigious honour.
India is elated and proud. #Oscars https://t.co/cANG5wHROt
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2023
या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘नाटू नाटू’ची लोकप्रियता जागतिक आहे. पुढील अनेक वर्षे स्मरणात राहिल, असं हे गाणं आहे. एम एम किरावाणी, चंद्रबोस आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारताला आनंद होत आहे आणि अभिमान वाटत आहे.’ असं ते म्हणाले आहे.
Congratulations to @EarthSpectrum, @guneetm and the entire team of ‘The Elephant Whisperers’ for this honour. Their work wonderfully highlights the importance of sustainable development and living in harmony with nature. #Oscars https://t.co/S3J9TbJ0OP
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2023
तर, दुसऱ्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले, “द एलिफंट विस्परर्स’ च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे महत्त्व अधोरेखित केले.’ अश्या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘द एलिफंट विस्परर्स’च्या संपूर्ण टीमचं कौतूक केलं आहे.