पुणे – रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली.
रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी पक्षात अनेक वर्ष कार्यरत आहे. त्यांनी पुण्याचे महिला शहराध्यक्षपद भूषवले आहे. नुकतीच त्यांच्या जागी स्वाती पोकळे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे चाकणकर यांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश केला जाणार असल्याची चर्चा होती.
रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !? pic.twitter.com/6SLd5WLB5X
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 27, 2019
दरम्यान, विधानसभा निवडणुकांपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. नुकतेच सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाची साथ सोडून हाती शिवबंधन बांधून घेतले. त्यानंतर शुक्रवारी रात्री चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला.