शिक्रापूर- हिंगणघाट नागपूर व औरंगाबाद येथे महिलांना पेट्रोल टाकून मारल्याच्या घटनेचा शिक्रापूर (ता. शिरूर) येथे स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच हे कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन शिक्रापूर पोलिसांना देण्यात आले आहे.
यावेळी स्वराज्य बहुजन सेनेचे अध्यक्ष राजाराम दगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन भावार, पुणे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळोले, संपर्क प्रमुख विशाल घोडगे, महिला प्रदेशाध्यक्षा स्वाती शिवले, कार्याध्यक्ष कमल गहिवट, शिरूर महिलाध्यक्षा छाया गालफाडे, हवेली तालुकाध्यक्ष विशाल कोळपे यांसह आदी पदाधिकारी व युवक उपस्थित होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस नाईक ब्रह्मा पोवार, अविनाश पठारे, स्वराज्य बहुजन सेनेचे अध्यक्ष राजाराम दगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन भावार यांनी या घटनांचा निषेध केला. तसेच राज्यात छत्रपती शासन लागू करण्याची मागणी देखील संघटनेतर्फे करण्यात आली.