मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज किसननगर येथे समुह विकास योजनेच्या(क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत कळवा, पारसिक, कोलशेत, वाघबीळ, बाळकुम – साकेत, कोपरी, शास्त्रीनगर, नागलाबंदर वॉटरफ्रंट या प्रकल्पांचे ई-भूमीपुजन करण्यात आले.
तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना”चे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.