…म्हणून तिने चक्क शेणाने ‘सारवून’ घेतली गाडी

अहमदाबाद – देशभरामध्ये सध्या नागरिक उन्हामुळे अक्षरशः होरपळून निघाले असून उन्हापासून स्वतःला वाचविण्यासाठी लोक अनेक क्लुप्त्या आजमावताना दिसत आहेत. अशातच आता अहमदाबाद येथील एका महिलेने ‘सूर्य देवाच्या’ कोपापासून स्वतःला वाचविण्यासाठी आगळी-वेगळी शक्कल लढवली असून या महिलेने चक्क आपल्या चारचाकी वाहनालाच शेणाने सारवून घेतले आहे. गाईच्या शेणाचा पोत दिलेल्या घरांमध्ये उष्णतेचा दाह कमी प्रमाणात जाणवतो अशी मान्यता असून याच आधारावर सदर महिलेने आपल्या टोयोटा कंपनीच्या चारचाकी कारला शेणाने सारवून घेतले आहे.

अहमदाबादमध्ये यंदा तापमान ४५ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त झाले असून अहमदाबादेत जनता उन्हामुळे हैराण आहे. अशातच आता या महिलेने उन्हापासून वाचण्यासाठी केलेला उपाय चांगलाच व्हायरल झाला आहे. सदर महिलेच्या चारचाकी वाहनाबद्दल सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा सुरु असून शेणाने पोतलेल्या तिच्या गाडीचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहेत.

दरम्यान, शेणाने सारवून घेतलेली गाडी महिलेला उन्हापासून कितपत संरक्षण देते हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेणाने गाडी पोतल्याने सदर महिला व तिची अजब आयडिया चांगलीच प्रसिद्ध झाली आहे हे मात्र नक्की.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.