पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरात एक हजाराहून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी केवळ 30 मंडळांनी अधिकृत वीजजोडणी फेज एक आणि फेज तीनसाठी अर्ज आले आहेत. त्यामुळे इतर मंडळांनी वीज व्यवस्था कशी केली आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात लहान मोठी एक हजार पेक्षा अधिक मोठी गणेश मंडळ आहेत. तर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीदत 1742 गणेश मंडळांची नोंद आहे. मात्र, अधिकृत वीजजोड घेण्यासाठी पिंपरी आणि भोसरी विभागात मिळून केवळ 30 अर्ज प्राप्त झाले असून त्यांना तात्पुती वीजजोडणी देण्यात आलेली आहे. तर पुणे परिमंडळात एकून 147 तात्परत्या वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
वीज वितरण महामंडळाने गणेश मंडळांसाठी स्वस्त दरात वीज उपलब्ध करून दिली असून भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तात्तुपरत्या स्वरुपातील अधिकृत वीजजोडण्या घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्याला मंडळांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे मंडळांनी अधिकृत वीजजोजणी घेणे आवश्यक आहे.
उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास 24 तास उपलब्ध असलेले 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.