आळंदी – श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये करियर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरीता विविध क्षेत्रातील करिअर संधी यावर अमीर अन्सारी (उपमुख्याध्यापक व करिअर समुपदेशक मदनी हायस्कूल, मुंबई) यांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रामुख्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया व करियर निवड कशी करावी याचे विश्लेषण करण्यात आले. या वेबिनारमध्ये 125 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
प्रश्न – उत्तरे या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रावर प्रश्न विचारले व समर्पक उत्तराने माहिती संपादन केली.
या वेबिनार चे आयोजन प्रशालेतील व्यवसाय मार्गदर्शन समितीच्या वतीने समुपदेशक प्रशांत सोनवणे व नारायण पिंगळे यांनी केले. तसेच वेबिनारामध्ये श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांच्या वतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक व व्याख्याते यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्वांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक दिपक मुंगसे यांनी मानले. सदर वेबिनारचे सूत्रसंचालन नारायण पिंगळे यांनी केले.