बारामती: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. कोविड 19 सारख्या महामारीमध्ये जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्याचे काम करत असताना त्याची तूटपुंज्या मानधनावर सरकारकडून बोळवण होत असल्याने आज आरोग्य सेवक, सेविका यांनी बारामती पंचायत समिती समोर एकच नारा कायम करा, अश्या घोषणा देऊन आंदोलन करीत आरोग्य खात्यात बिनशर्त समायोजन करण्याची मागणी केलीय.