पिंपरी – दारू पिताना झालेल्या भांडणात एका तरुणाचे दगडावर डोके आपटून खून करण्यात आला. ही घटना दापोडी येथे गुरुवारी (दि. 18) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
अजय शशिकांत सूर्यवंशी (वय 30, रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अजय हा आपल्या तीन मित्रांसह दापोडी येथील हॅरिस पुलाखाली दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले.
यावेळी चिडलेल्या मित्रांनी त्याचे डोके दगडावर आपटून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत दापोडीतील ही खूनाची दुसरी घटना आहे. आरोपींबाबत माहिती मिळाली असून लवकरच आरोपी गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.