परभणी – राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसाने काहींचा जीव गेला आहे. दरम्यान परभणी शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. तर महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.
परभणी शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. (One dies after wall collapses due to unseasonal rain; Incidents in Parbhani district)
यात शहरातील काद्राबाद प्लाट येथे राहणाऱ्या ४७ वर्षीय शेरखान यांच्या अंगावर शेजारील घराची भिंत कोळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शेरखान यांची पत्नी देखील जखमी झाली आहे. मयत हा कुटुंबातील कमवता एकमेव सदस्य असल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी] अशी मागणी कुटुंबातील सदस्यांनी प्रशासनाकडे केली आहे.