सातारा – साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सिद्धेश त्र्यंबके यांच्या नेतृत्वाखालील टीमने बुलढाणा जिल्ह्यातील 70 वर्षीय महिलेला शेवटच्या टप्प्यातील कर्करोगावर यशस्वीरित्या उपचार करून पुनर्जीवन दिले. प्रतिभा शेळके (रुग्णाचे नाव बदलेले आहे) यांचे आयुष्य अगदी सुरळीत सुरु होते. मात्र रजोनिवृत्ती, पाठीचे दुखणे, भूक न लागणे अशा तक्रारींमुळे त्यांच्या दैनंदिन कामात अडचणी येऊ लागल्या.
बरीचशी औषधे घेऊन झाल्यानंतर रुग्णाला डॉ. सिध्देश त्र्यंबके यांच्याकडे उपचारासाठी जाण्यास सांगितले. डॉक्टरांनी केलेल्या चाचणीनंतर रुग्णाला शेवटच्या टप्प्यातील गर्भाशयाचा पिशवीच्या तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तिला नवीन आयुष्य देण्याचा निश्चय केला. हा आजार शरीरात पसरत चालला होता. या महिलेला रक्तस्त्राव, पाठदुखी आणि भूक न लागणे तसेच वजन कमी होणे, अशा तक्रारी भेडसावत होत्या. उपचारानंतर आता मात्र रुग्ण निरोगी झाला आहे आणि कोणतीही तक्रार न करता रुग्णाला दैनंदिन कामे सहजरित्या करणे शक्य झाले आहे.
डॉ. सिद्धेश त्र्यंबके म्हणाले, “”रुग्णाची तपासणीनंतर गर्भाशयाच्या जवळच्या हाडामध्ये आजार पसरल्याने चौथ्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले. अशा वेळी आजार शरीरातील इतर भागात पसरू न देता रुग्णाला कसे बरे करता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून या आजारावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रुग्णावर रेडिकल- क्युअर रेन्डरिंग ट्रीटमेंट करण्यात आली. ज्यामध्ये रेडिएशन डिलीव्हरीची अत्यंत प्रगत यंत्रणा, बाह्य (ईबीआरटी) आणि अंतर्गत (ब्रॅकिथेरपी) या दोन्ही गोष्टींचा समावेश होता. इन्टेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी (आयएमआरटी), इमेज-गाईडेड रेडिएशन थेरपी (आयजीआरटी) आणि स्टिरियोटेक्टिक रेडिएशन थेरपी (एसआरटी) या सारख्या नवीन ईबीआरटी तंत्राचा वापर करण्यात आला.
रेडिएशनच्या परिणामास चालना देण्यासाठी येथे केमोथेरपी जोड देण्यात आली. स्टिरिओटाक्सी (एसआरटी) हे रेडिएशन डिलीव्हरीचे एक अत्यंत प्रगत तंत्र आहे. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याचे दिसून आले.” आजारपणामुळे मी जगण्याची आशाच गमावली होती. मात्र ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरने मला जगण्याची नवी आशा दिली. डॉ. सिध्देश त्र्यंबके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या उपचारांमुळे मी पुन्हा आता निरोगी जीवनशैली जगू शकते, असे या रुग्णाने सांगितले.