कॉंग्रेस केंद्रात यूपीए-3 सरकार स्थापण्याच्या मार्गावर – सलमान खुर्शिद

उत्तरप्रदेशचे निकाल चकित करणारे असतील

लखनौ -लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसची कामगिरी अनेकांच्या अपेक्षेपलिकडील असेल. कॉंग्रेस केंद्रात यूपीए-3 सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर आहे, असे भाकीत त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी बुधवारी केले.

खुर्शिद यांनी एका मुलाखतीत बोलताना कॉंग्रेसच्या चांगल्या कामगिरीबाबत विश्‍वास व्यक्त केला. उत्तरप्रदेशातील निकाल चकित करणारे असतील. त्या राज्यात 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने लोकसभेच्या 21 जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्या कामगिरीची बरोबरी होईल किंवा त्यापेक्षाही चांगली कामगिरी होईल, असे ते म्हणाले. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रियंका फॅक्‍टर कॉंग्रेसची कामगिरी सुधारण्यात हातभार लावेल, असे त्यांनी म्हटले. किमान उत्पन्नाची हमी देणाऱ्या कॉंग्रेसच्या न्याय योजनेचा निवडणुकीवर परिणाम होईल. कॉंग्रेस पक्ष केवळ बोलत नाही तर करून दाखवतो असा विश्‍वास जनतेला आहे, असे नमूद करत त्यांनी पक्षाला अलिकडेच सत्ता मिळालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढ या राज्यांचा संदर्भ दिला. त्या राज्यांत पक्षाने कर्जमाफीच्या आश्‍वासनाची पूर्तता केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.