माढ्यासाठी सर्वाधिक मतदान

माण-खटाव पिछाडीवर 12 लाख मतदार ठरविणार भवितव्य

सातारा – माढा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला आहे. सन.2014 च्या निवडणुकीत 62.50 टक्के तर यंदाच्या निवडणुकीत 63.58 टक्के मतदान झाले आहे. सहा विधानसभा मतदारसंघापैकी माढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 69.52 टक्के तर सर्वात कमी मतदान माण-खटाव विधानसभा मतदारसंघात 57.11 टक्के इतके झाले आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 12 लाख 11 हजार 48 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 6 लाख 56 हजार 753 पुरूष मतदार तर 5 लाख 54 हजार 295 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान संख्या व कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे, माढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 2 लाख 25 हजार 708 (69.52 टक्के ), माळशिरस विधानसभा मतदारसंघात 2 लाख 7 हजार 561 (64.97 टक्के), करमाळा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 88 हजार 999 (62.40 टक्के ), सांगोला विधानसभा मतदारसंघात 1 लाख 85 हजार 818 (64.20 टक्के), फलटणविधानसभा मतदारसंघात 2 लाख 9 हजार 803 (63.55 टक्के ), माण-खटाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 93 हजार 159 (57.11 टक्के) इतक्‍या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान, माढा विधानसभा मतदारसंघात काही केंद्रांवर मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाला असून त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी भाजपचे उमेदवार रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग निंबाळकर यांच्या तक्रारीवर काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.