Fatima Sana – किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानचे फातिमा सना शेखसोबत अफेर असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहे सोशल मीडियावर या दोघांचे लग्न करत असल्याची बातमीही अनेकदा व्हायरल झाली आहे. आमिर खान लवकरच फातिमाशी लग्न करणार अशा एक ना अनेक फोटो व्हायरल झाले आहे. आमिर खान यांच्या घटस्फोटानंतर फातिमालाही खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या सर्व अफवा असल्याचे आता पहिल्यांदाच फातिमाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगतिले आहे.
नुकतीच ‘सॅम बहादूर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान फातिमाने आपल्या लाईफचे अपडेट माध्यमांशी शेअर केले. तिने सांगितले,’सॅम बहादूर’ चित्रपटासाठी एक कोटी रुपये फी देण्यात आली आहे. तसेच जेव्हा तिला आमिर खान सोबतच्या अफवांवर प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ती म्हणाली,’आम्ही एकत्र अनेकदा दिसलो आहे पण आमच्यात असं काही नाही. ते माझे चांगले मित्र आहे.’ असं म्हणत तिने आपली भूमिका मांडली आहे.
दरम्यान,फातिमा सना शेखचे नाव आमिर खानशी जोडले गेले आहे. अभिनेत्याने किरण रावपासून घटस्फोट घेतला तेव्हाही या अभिनेत्रीमुळेच त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. फातिमा वैयक्तिक पार्ट्यांमध्येही हजेरी लावते.
तिच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, विकी कौशल स्टारर चित्रपटात फातिमा सना शेख माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.