कंपनी कमांडरची हत्या करून जवानाची आत्महत्या

झारखमडमधील घटनेने खळबळ; अमानवी वातावरणामुळे सुरक्षा दलांत नाराजी

रांची : झारखंड येथे निवडणुकीच्या सेवेवर नियुक्त असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानाने कंपनी कमांडरची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही भीषण घटना सोमवारी (दि. 9) पहाटे रांचीतील खेलगाव भागात घडली.

विक्रमादित्य राजवाडे असे या हवालदाराचे नाव आहे. तो छत्तिसगढ सशस्त्र दलात कार्यरत होता. त्याने इन्सास रायफलमधून 10 ते 12 गोळ्या झाडल्या. त्यात मेलाराम कुर्रे हा 61 वर्षीय अधिकारी मरण पावला. ते 61 वर्षांचे होते. पुढील महिन्यात ते निवृत्त होणार होते. सलग सेवेत आसणे आणि मुलभूत सुविधांची वानवा यामुळे ही घटना घडल्याचे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सुत्रांनी सांगितले. रांची येथील खेलगाव कॉम्प्लेक्‍समध्ये निमलष्कराच्या 20 तुकड्या तैनात आहेत.

झारखंडमध्ये सेवेत असणाऱ्या जवानांना अमानवी वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना अन्न, पाणी, शौचालय अशा मुलभूत सुविधाही मिळत नसल्याची तक्रार केंद्रीय राखीव पोलिस दलाचे असिस्टंट कमांडंट राहुल सोळंकी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली होती. सर आपल्या देशात नक्षलवादी, दहशतवाद्यानंतर जवानांनाही मानवी हक्क आहेत, असे त्यांनी उद्वीग्नतेने म्हटले होते. झारखंडमधील निवडणूक 20 डिसेंबरला संपणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)