विभागीय आढावा बैठकीला खडसें पाठोपाठ पंकजा मुंडेंचीही दांडी

पुणे: राज्यातील सत्ता नाट्य संपल्यानंतर आता भाजपने राज्यात विभागवार आढावा बैठकी घेण्यास सुरवात केली आहे.  भाजप पराभूत झालेल्या मतदार संघातील कारणांचा तसेच राजकीय समीकरणांचा आढावा या बैठकांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या बैठका सुरु आहेत. परंतु या बैठकांकडे भाजपमधील नाराज नेतेमंडळींनी पाठ फिरवली आहे.

रविवारी जळगाव मध्ये झालेल्या बैठकीत जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर आज औरंगाबाद मध्ये झालेल्या बैठकीत पंकजा मुंडे यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे भाजपच्या नेतेमंडळीत असलेली नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. त्यातच मुंडे याच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

रविवारी जळगावात झालेल्या भाजपच्या विभागवार आढावा बैठकीत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गैरहजरीमुळे भाजपमधील नेत्यांची नाराजी समोर आली होती. तर आज औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा विभागाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप नेते उपस्थित आहेत. मात्र पंकजा मुंडे यांची गैरहजरी पाहायला मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.