Serie A 2019-20 Football : लाजियो संघाचा युवेंट्सवर विजय

इटली : रोममध्ये गतविजेत्या युवेंट्स संघाला लाजियो संघाकडून १-३ असा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे आता सिटी ए फुटबाॅल स्पर्धेतील विजेतेपदाची शर्यत रोमांचक झाली आहे. युवेंट्सचा हा सत्रातील पहिला पराभव आहे. या पराभवसह आठवेळा गतविजेता युवेंट्स संघ दुस-या स्थानावर पोहचला आहे.

युवेंट्स संघाकडून २५ व्या मिनिटाला ख्रिस्टियानो रोनाल्डोने एकमेव गोल केला. तर लाजियो संघाकडून लुइस फेलिप रामोस मार्ची, सर्गेज मिलिनकोविच साविच आणि फेलिप काइसेडोने प्रत्येकी १ गोल केला.

सिरी ए फुटबाॅल स्पर्धेत इंटर मिलनचा संघ १५ सामन्यात ३८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. युवेंट्स ३६ गुणांसह दुस-या तर लाजियाचा संघ ३३ गुणासह तिस-या स्थानी आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)