अयोध्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्येतील एका गरीब कुटुंबाला भेट दिली. हे कुटुंब “प्रधानमंत्री उज्ज्वला योजने”चे 10 कोटीवे लाभार्थी आहेत. येथे पंतप्रधान मोदींना त्या कुटुंबियांसोबत चहाही घेतला. गरीब कुटुंबाना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर पुरविण्याबाबत उज्ज्वला योजना आहे.
पीएम मोदी अयोध्येतील अरुंद रस्त्यांवरून गेले तेव्हा मोठ्या जनसमुदायाने त्यांचे स्वागत केले. एका मुलाने दाखवलेल्या पेंटिंगवर पंतप्रधानांनी स्वाक्षरीही केली. आज पंतप्रधान मोदींनी अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले आणि दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
आज अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामचे पीएम मोदी यांनी उद्घाटन केले. रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्टेशनला भेट दिली. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर उपस्थित होते. अधिका-यांनी सांगितले की, पुनर्विकसित स्टेशन (अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशन) चा टप्पा-I 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्चून पूर्ण झाला आहे.
तीन मजली रेल्वे स्थानकाची इमारत लिफ्ट, एस्केलेटर, फूड प्लाझा, पूजेसाठी लागणारी दुकाने, क्लोक रूम, चाइल्ड केअर रूम, वेटिंग हॉल अशा सुविधांनी सुसज्ज आहे. पंतप्रधानांची ही भेट राम मंदिरातील ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यापूर्वी झाली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींसह अनेक सेलिब्रिटी आणि देशभरातील निमंत्रित सहभागी होणार आहेत.