नवी दिल्ली – सध्या कुस्ती विषयक उपक्रम गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहेत. पुढील सात महिन्यात ऑलिम्पीक स्पर्धा होणार आहे, त्यामुळे त्याच्या तयारीसाठी कुस्तीपटूंना लगबग करावी लागणार आहे त्यामुळे क्रिडा मंत्रालयाने त्वरीत कुस्ती विषयक उपक्रम सुरू करावेत अशी मागणी ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने केली आहे.
पुनियाने एक्स वर म्हटले आहे की, २०२४ ऑलिम्पिक खेळ पुढील सात महिन्यांत होतील परंतु अद्याप कोणीही या स्पर्धेला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. ऑलिम्पिक खेळांच्या तयारीसाठी खेळाडूंना मदत करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धा किंवा शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे कुस्तीपटूंचे भविष्य अंध:कारमय झाले असून त्यांचे भविष्य वाचवण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने हे उपक्रम त्वरीत सुरू केले पाहिजेत.
कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करून त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला बजरंग पुनिया यांनी पाठिंबा दिला होता.
पिछले कई महीना से कुश्ती का कामकाज ठप है. न कोई नेशनल हुआ है और न ही खिलाड़ियों को तैयार करने के लिए कैम्प लगे हैं. 7 महीने बाद ओलंपिक खेल भी हैं लेकिन कोई भी ओलंपिक के लिए गंभीर नहीं दिख रहा जबकि पिछले चार ओलंपिक्स में कुश्ती ने लगातार चार मेडल दिए हैं.
खेल मंत्रालय से निवेदन…— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) December 30, 2023
कुस्तीगीर महासंघ्यावर पुन्हा ब्रिजभुषण समर्थकच निवडून आल्यानंतर त्यांनी आपला पद्मश्री पुरस्कार परत केला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने ही नवी कार्यकारीणी निलंबीत केली आहे. त्यामुळे आता कुस्ती विषयक उपक्रम कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तो मुद्दा बजरंग पुनिया यांनी उपस्थित केला आहे.