नवी दिल्ली – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) च्यावतीने 16 जून 2021 रोजी नियोजित करण्यात आलेली आयएनआय-सीईटी परीक्षा 2021 लांबणीवर टाकण्यात आली आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर घेण्यात आला आहे. यासंदर्भात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान परीक्षेसंदर्भात नोटिफेकशन जारी करणार आहे.
वकील पल्लवी प्रताप यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एका आश्वासनाचा उल्लेख करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल-मेच्या दरम्यान पुढील चार महिने परीक्षा घेण्यात येणार नाहीत, असे जाहीर केले होते. एम्सच्या परीक्षा आयोजित करणं त्या आश्वासनाचा अपमान असल्याचा दावा करण्यात आला होता.
इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंपोर्टेस कंबाईन्ड प्रवेश परीक्षेची प्रवेशपत्र बुधवार 9 जून रोजी जारी केली होती. तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षा स्थगित करावी यासाठी आंदोलन केले होते. तसेच विद्यार्थ्यांनी ट्विटरवर मोहिम राबवली होती.