स्थानिक पंचायतीने सुनावली तीन वर्षाची कारावासाची शिक्षा
जुबा : आफ्रिकेतील दक्षिण सुदानमध्ये एक विचित्र अशी घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका मेंढीने एका महिलेची हत्या केल्यानंतर या मेंढीला स्थानिक पंचायतीने तब्बल तीन वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 45 वर्षीय आधीयु चापिंग या महिलेच्या छातीवर शिंगांच्या साहाय्याने अनेक वार करून या मेंढीने तिला ठार मारले होते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी स्थानिक पद्धतीने झाली.
गावातील वयस्कर आणि अनुभवी लोकांनी एकत्र येऊन या प्रकरणावर चर्चा केली. निकाल दिला आणि या महिलेच्या हत्येला जबाबदार असल्याबद्दल या मेंढीला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. या मेंढीला आता लष्कराच्या शिबिरामध्ये तीन वर्ष आपले जीवन व्यतीत करावे लागणार आहे. स्थानिक पंचायतीने या मेंढीच्या मालकालाही जबाबदार धरले असून महिलेच्या कुटुंबियांना या मालकाने पाच गाई नुकसान भरपाई म्हणून द्याव्यात असा निकाल दिला आहे.
दक्षिण सुदानमधील रूमबॅक पूर्व या शहरांमध्ये ही घटना घडली तेथील स्थानिक पोलिस अधिकारी इलीजाह माबोर यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी गाय हे धन मानले जाते म्हणूनच या प्रकरणात मरण पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांना मेंढीच्या मालकाने पाच गाई नुकसान भरपाई म्हणून द्याव्यात असा निकाल स्थानिक पंचायतीने दिला आहे. स्थानिक पंचायतीने हा निर्णय जाहीर केल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या मेंढीला ताब्यात घेतले आणि आपल्या पोलिस स्टेशनमधील साध्या तुरुंगात तिची रवानगी केली.
या हल्ल्यामध्ये मरण पावलेली महिला आणि तिचे कुटुंबीय आणि मेंढीचा मालक एकमेकांच्या शेजारी राहत होते त्यांचे संबंध ही चांगले होते पण मेंढीने त्या महिलेची हत्या केल्यानंतर त्यांच्या मध्ये थोडासा दुरावा आला पण शेवटी त्यांनी सहमतीने पाच गाई नुकसानभरपाई म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मान्य केला