वॉशिंग्टन : एखादी गोष्ट हरवली तर तीशोधण्यासाठी आपण अथक प्रयत्न करतो, सगळे प्रयत्न करूनही ती गोष्ट मिळाली नाही तर आपण त्या गोष्ट सोडून देतो. मात्र काही काळाने जर तीच गोष्ट आपल्याला परत मिळाली तर…होय असेच काही घडले आहे. ऍटलांटामध्ये नुकतीच अशी एक घटना घडली आहे तब्बल 65 वर्षांपूर्वी हरवलेली एक पर्स पुन्हा एकदा मूळ मालकाकडे परत गेली आहे.
एका चित्रपटगृहाचे नूतनीकरण सुरू असताना ही पर्स सापडली त्यानंतर मूळ मालकाचा शोध घेऊन ती त्या मालकाला परत करण्यात आली. अटलांटामधील या चित्रपटगृहाचे नूतनीकरण सुरू असताना एका भिंती पलीकडे काही वस्तू सापडल्या त्यामध्ये ही पर्स होती. 1958 मध्ये ही पर्स त्या ठिकाणी हरवली होती.
चित्रपटगृहामध्ये जर काही वस्तू सापडल्या तर त्या सुरक्षित ठेवण्यासाठी एक खोली करण्यात आली होती. त्या खोलीमध्ये ही पर्स होती काम करणाऱ्या कामगारांनी ही पर्स चित्रपटगृहाचे मालक एस्कोबार यांच्याकडे दिली. एस्कोबार यांनी या पर्सची व्यवस्थित पाहणी केली आणि त्यामधील कागदपत्रांच्या आधारे त्यांनी पत्त्याचा शोध घेतला.
ह्या पर्सची मालक लॉयकल बरेच नावाची व्यक्ती होती पण 2005 मध्ये त्या व्यक्तीचा निधन झाले होते पण एस्कोबा यांनी अरे त्यांच्या मुलीकडे ही पर्स सुपूर्द केली. आपल्या वडिलांची ती हरवलेली पर्स पाहताच त्या मुलीलाही अश्रू अनावर झाले. या पर्समध्ये जेव्हा ती हरवली होती. तेव्हा लायब्ररीचे एक तिकीट घराचा पत्ता आणि इतर गोष्टी असल्यामुळे पत्ता शोधणे सोपे गेले सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संबंधित कुटुंब त्याच ठिकाणी रहात होते आणि त्यांचे निवासाचे ठिकाण या चित्रपटगृहाच्या शेजारीच होते. त्यामुळे या कुटुंबाचा पत्ता लावणे ही चित्रपटगृह मालकांना शक्य झाले.