हरियानात भाजप पैकीच्या पैकी; रोहटक, फरीदाबादच्या जागाही भाजपकडेच

चंदीगड: हरियाना राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे दहाही जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्या राज्यांतील रोहटक आणि फरीदाबाद या दोन मतदार संघांतील मतमोजणी आज शुक्रवारी सकाळी संपली. त्या दोन्ही जागा भाजपलाच मिळाल्याने त्यांचे दहाही उमेदवार अधिकृतरित्या विजयी घोषित करण्यात आले आहेत. या राज्यातील भाजपचा हा सर्वात उत्तम परफॉर्मन्स आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला येथे सात जागा मिळाल्या होत्या. तर कॉंग्रेसला एक आणि लोकदलाला दोन जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत सोनिपत मधून भुपिंदरसिंग हुडा आणि रोहटक मधून त्यांचे पुत्र दीपेंद्रसिंग हुडा हे दोघेही पराभूत झाले. दीपेंद्रसिंह हुडा हे रोहटकचे विद्यमान खासदार होते. त्यांना भाजपचे अरविंद शर्मा यांनी पराभूत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.