मुंबई – स्टार किडमधील प्रसिद्ध व्यक्ती ‘न्यासा’ ही अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची मुलगी. लाइमलाईटपासून दूर असणारी न्यासा बऱ्याच दिवसांनी एका पार्टीमध्ये दिसून आली. भूमी पेडणेकरने दिलेल्या या पार्टीमध्ये अनेक व्हीआयपी लोकांनी हजेरी लावली होती. ज्यात फिल्म स्टारसह उद्योग जगतातील चेहरे देखील सामील झाले होते.
न्यासा देवगण देखील पार्टीमध्ये आली होती. आपल्या मित्रांसोबत तिने हा वेळ एन्जॉय केला. यावेळी न्यासाने गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. खुले सोडलेली केस आणि कानात घातलेले झुमके यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खूलून दिसत होते. १८ वर्षांची न्यासा सिंगापूरमध्ये आपल्या शिक्षणासाठी होती.
काही दिवसांपूर्वी न्यासा देखील बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या परंतु एका शो दरम्यान स्वतः अजय देवगणने न्यासा सध्या आपल्या अभ्यासावर लक्ष देत असून चित्रपटात येण्याचा तिचा विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. न्यासा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते परंतु तिचा हा पार्टी लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. एका युजरने तिच्या फोटो पाहून ही एव्हढी मोठी केव्हा झाली असा सवाल विचारला आहे. तर दुसऱ्या युजरने फोटोतील तिची स्माईल पाहून अभिनेत्री काजोलची आठवण होत असल्याचे म्हंटले.