मुंबई – काजोलचा चित्रपट सलाम वेंकी OTT प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा देखील शुक्रवारी करण्यात आली.रेवती दिग्दर्शित हा भावनिक चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितकासा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, पण समीक्षकांनी त्याचे चांगलेच कौतुक केले होते. या चित्रपटात आमिर खानने खास भूमिका साकारली होती.
आमिर आणि काजोलने फना या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर हे दोन्हही स्टार्स सलाम वेंकी निमित्त एकत्र आले होते. या बड्या स्टार व्यतिरिक्त आहाना कुमरा, राहुल बोस, राजीव खंडेलवाल आणि प्रकाश राज यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
हा चित्रपट १० फेब्रुवारीला Zee5 वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात काजोलने सुजाता नामक आईची भूमिका साकारली आहे. जिच्या मुलाला असाध्य आजार आहे. विशाल जेठवा मुलाच्या भूमिकेत आहे.सर्व अडचणी असूनही जीवन जगू पाहणारे हे पात्र आहे.
सलाम वेंकीसोबत काजोल दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतली होती. तिने 2021 मध्ये त्रिभंग मधून ओटीटीवर पदार्पण केले. आता काजोल डिस्ने प्लस हॉटस्टारच्या द गुड वाईफ या वेब सीरिजमध्ये देखील दिसणार आहे.