परवानगी न घेता फोटो कसा वापरला?

कोलकाता- अभिनेत्री आणि तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी कोलकाता पोलिसांकडे तक्रार केली आहे. इंटरनेटवर एका व्हिडिओ ऍप्लिकेशनसाठी आपला फोटो वापरून प्रचार केला जात आहे. मात्र त्याकरता आपली परवानगी घेण्यात आली नसल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
विनापरवानगी आपला फोटो वापरल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून कोलकाताच्या पोलीस आयुक्तांनाही यात टॅग केले आहे.

खासदार झाल्यापासून नुसरत कायम चर्चेच असतात किंवा वादाच्या भोवऱ्यातही सापडतात. काही काळापूर्वीच त्यांचा दुर्गामातेच्या वेशभुषेतील फोटो प्रसिध्द झाला होता. त्यावरूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. विशेष म्हणजे त्यांना मुस्लिम समुदायाने लक्ष्य केले होते.नुसरत यांच्या मुस्लिम असण्यावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. 

नुसरत जहां हिंदूंप्रमाणे आचरण करतात, मग त्या मुस्लिम कशा, असा सवाल उपस्थित करताना त्या इस्लामचा अपमान करत असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

नुसरत यांचा तो व्हिडिओ त्यांनी स्वत: अपलोड केला होता. मात्र त्यावर टीका झाल्यावरही त्यांनी अदयाप प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्षी नुसरत यांचा उद्योजक निखिल जैन यांच्याशी विवाह झाला आहे. तेव्हाही त्यांना लक्ष्य करण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.