#IPL2020 : कोविड योद्ध्यांचा आरसीबी करणार ‘अशाप्रकारे’ सन्मान

दुबई – जगभरात करोना रुग्णांसाठी अथक परिश्रम घेत असलेल्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने एक नव्या रचनेची जर्सी परिधान करण्याचे ठरवले आहे. यावर करोना वॉरिअर्स असे लिहिले गेले असून त्याद्वारे या महान लोकांना सलाम करण्याचा प्रयत्न असल्याचे मत संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्‍त केले आहे. 

अमिरातीत यंदा होत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या सर्व सामन्यांसाठी मैदानात उतरताना सर्व खेळाडू हीच जर्सी वापरणार आहेत. या जर्सीवर माझे कोविड हिरो, करोना वॉरिअर्स, असे लिहिण्यात आले आहे. करोनाच्या संकटात लोकांना मदत करणाऱ्या या व्यक्‍तींना सलाम करण्यासाठी कोहलीच्या संघाने हे एक अभिनव पाऊल उचलले आहे. करोनाच्या काळात सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी उतरणाऱ्या या योद्ध्यांना संघाने हा पूर्ण मोसम जर्सीच्या माध्यमातून समर्पित केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.