नुसरत भरुचाने आपल्या आतापर्यंतच्या “प्यार का पंचनामा’, “कल किसने देखा है’, “प्यार का पंचनामा 2′,”सोनू की टिटू की स्वीटी’ यासारख्या फिल्ममध्ये ग्लॅमरस रोल केले आहेत.
मात्र “छलांग’नंतर तिची प्रतिमा एकदम बदलून गेली. जरा हटके रोल आपण सहज करू शकतो, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. त्यापैकीच “जनहित में जारी’ हा तिचा आगामी सिनेमा असणार आहे.
यामध्ये ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीचा रोल करणार आहे. नोकरीची गरज असल्याने तिला कंडोम बनवणाऱ्या कंपनीत ‘सेल्स ऍन्ड प्रमोशन एक्झिक्युटिव्ह’चे काम करायला लागते.
आपल्या कामाचा भाग म्हणून तिला मेडिकल स्टोअरपासून इतर अनेक ठिकाणी कंडोम विक्री करत हिंडावे लागते.
अशा ठिकाणी तिला काय-काय अनुभव येतात, याचीच कॉमेडी कहाणी म्हणजे “जनहित में जारी’ असणार आहे. या सिनेमाचा डायरेक्टर राज शांडिल्य आणि नुसरत भरुचाने यापूर्वी “ड्रीम गर्ल’साठीही एकत्र काम केले होते.
या सिनेमाच्या कथेची कल्पना जेव्हा राज शांडिल्यला सुचली, तेव्हा नुसरतने स्वतःहून हा रोल करण्याची तयारी दर्शवली. तिची एक्साईटमेंट आता पडद्यावर प्रत्यक्षच बघायला मिळेल.