नवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार आणि मिझोराम येथे नवे कोरोनाबाधित आढळल्याने देशभरातील कोरोनोग्रस्तांची संख्या 562 वर पोहोचली. तर तामिळनाडूत एक 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 11 वर पोहोचली आहे. देशातील 130 कोटी जनतेला पुढील तीन आठवड्यात घरी लॉकडाऊन करण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, सर्व नागरिकांना जिवनावश्यक वस्तू मिळण्याची काळजी दिल्ली सरकार घेईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मी मीसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकून घरात बसलो आहे. तुम्हीही तुमच्या गृहमंत्र्यांचे ऐकून घरात बसा, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. त्यानंतर पंतप्रधानांनी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, फ्रान्समध्ये मंगळवारी आणखी 240 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले. त्यामुळे मृतांची संख्या 1100 वर पोहोचली आहे. त्यामुळे चीन, इटली, इराण आणि स्पेन पाठोपाठ फ्रान्समध्येही मृतांचा आकडा हजारच्या वर गेला आहे. दिवसभरात अमेरिकेत 150 जणांनी प्राण गमावल्याचे वृत्त हाती येत आहे. तरीही एप्रिल 12 पासून देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची आशा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.