उन्नावमध्ये उत्तरप्रदेश सरकारविरोधात NSUI चे आंदोलन

उत्तर प्रदेश – उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे दिल्लीतील सफदरगंज हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री निधन झाले. पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. नॅशनल स्टूडंट यूनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या सदस्यांचे उत्तर प्रदेश सरकारविरोधात उन्नावमध्ये आंदोलन सुरू आहे. यावेळी पीडितेच्या कुटुंबियांशी भेट घेण्यासाठी आलेल्या NSUI च्या सदस्यांनी भाजप खासदार साक्षी महाराज, आणि उत्तर प्रदेशचे मंत्री कमल रानी वरुण यांना घेराव घालत निदर्शने केली.

दरम्यान, कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांनी उन्नावच्या बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांची काही वेळापूर्वी भेट घेतली आहे. प्रियंका यांनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी बलात्कार पीडित तरुणीला सुरक्षा का पुरविण्यात आली नव्हती, असा स्वाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. या घटनेविरोधात समाजवादी पक्ष आणि कॉंंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लखनऊमध्ये आंदोलन केले.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणांनी गुरुवारी भर रस्त्यात जिवंत जाळले. यामध्ये ती 90 टक्के भाजली होती. दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. तिच्या मृत्यूनंतर देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना हैदराबादप्रमाणेच आम्हालाही न्याय द्या, अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.