ल्युसन : भारतीय पुरूष हाॅकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग याला आंतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाच्या या वर्षीचा सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टोकियो आॅलिंपिकसाठी पात्र ठरला आहे.
याशिवाय, उद्योन्मुख खेळाडू म्हणून पुरूष व महिला गटामध्ये अनुक्रमे विवेक प्रसाद आणि लालरेमसियानी या दोघांना नामांकन प्राप्त झाले आहे.
Hockey: Indian men's hockey captain Manpreet Singh was on Friday nominated for the Player of the Year award by the International Hockey Federation (FIH) after he led the country to a Tokyo Olympics berth. pic.twitter.com/XPJdDEmqmx
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 6, 2019
२७ वर्षीय मनप्रीत याने आतापर्यत २४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने भुवनेश्वरमध्ये रूस संघाला ११-३ ने हरवत टोकियो आॅलिंपिकमध्ये स्थान पक्के केले होते.
२९ वर्षीय प्रसाद मिडफील्डर आहे. त्याने मागील वर्षी युवा आॅलिंपिक मध्ये रौप्यपदक जिंकणा-या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते तर लालरे मसियानी ही खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाची सदस्य होती.