मुंबई – ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित ‘पानिपत’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. भव्य सेट्स, युध्दाचे आक्रमक प्रसंग, डायलॉगबाजी, अॅक्शन आणि लव्हस्टोरी यांचा त्रिवेणी संगम या चित्रपटात दिसून येत आहे.
#Panipat records low numbers on Day 1… Reports [word of mouth] are positive and its biz, hopefully, should see a turnaround on Day 2 and 3… Fri ₹ 4.12 cr [2395 screens]. #India biz… Showcasing at multiplexes affected due to excessive run time [close to 3 hours].
— taran adarsh (@taran_adarsh) December 7, 2019
अर्जुन कपूर, क्रिती सनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे आणि मोहनिश बेहेल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी जोरदार कमाई केली आहे.
‘पानिपत’ने शुक्रवारी ४.१२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘पानिपत’मध्ये अर्जुन कपूरने साकारलेली सदाशिवभाऊंची भूमिका अपेक्षित उंची गाठताना दिसत आहे.