मुंबई – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ लोकशाही वृत्तवाहिनीवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमुळे भाजपसह सर्वच पक्षाचे नेते यावर बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याविषयीच्या चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट सोमय्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यामध्ये काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर शाब्दिक टीका केली आहे.
विधिमंडळात देखील आज हाच मुद्दा गाजला असून, विरोधकांनी देखील सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओवरुन जोरदार भाषण केलं.
यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की, “कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बरच काही बाहेर आलय. हे प्रकरण गंभीर असून, त्या बद्दल महाराष्ट्राला सर्व खरं समजलं पाहिजे. ज्या महिलेने व्हिडिओ पाठवला त्या महिलेला शोधून काढणं तुमच काम आहे. ही सेक्स खंडणी आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी हा व्हिडिओ खोटा आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. मी कुठल्याही महिलेवर अत्याचार केला नाही असं त्यांनी म्हटलय. याचा अर्थ तो व्हिडिओ खरा आहे, हे त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलय का?’ असं सुद्धा अनिल परब म्हणाले.
किरीट सोमय्यांचं फडणवीसांना पत्र…
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही. अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी देवेंद्र फडणवीस यांना विनंति असे ट्विट सोमय्या यांनी घडलेल्या सर्व प्रकरणानंतर केले आहे.
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023