आता चंद्रावरील स्वारीची चर्चा थांबवा; अध्यक्ष ट्रम्प यांची नासाला सुचना

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नासाला चंद्रावर जाण्याच्या मोहीमा थांबवण्याची जाहीर सुचना केली आहे. त्यांनी आपल्या ट्‌विटर संदेशात ही सुचना करताना म्हटले आहे की आपण 50 वर्षापुर्वीच चंद्रावर जाऊन आलो आहोत आता चंद्रावर जाण्याची चर्चा थांबवली पाहिजे. आपण केवळ चांद्र मोहीमांसाठीच नासावर पैसे खर्च करीत नाही हेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.आपल्याला आता मंगळ स्वारीसह अन्यही अनेक मोठ्या मोहीमा पार पाडायच्या आहेत असे ट्रम्प यांनी नासाला सांगितले आहे. नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे.

अध्यक्ष ट्रम्प यांनी नासाला ही जाहीर सूचना करण्याचा नेमका अन्वयार्थ लोकांच्या लक्षात आलेला नाही. चंद्रावर जाण्यापेक्षा आता मंगळाच्या मोहीमा आखा असे त्यांना म्हणायचे असेल तर ती महत्वाची सुचना ट्‌विटरवर का केली याचे अजून आकलन झालेले नाही. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनीच नासा आता सन 2014 वर पुन्हा चंद्रावर स्वारी करणार असल्याची घोषणा केली होती. नासाने आत्तापर्यंत 1969 ते 1972 या अवधीत सहावेळा मानवासहित चंद्रावर यान धाडले आहे. अध्यक्ष ट्रम्प हे अंतरीक्ष विषयावर जाहीर भाष्य सहसा करीत नाहीत. हा विषय त्यांनी उपाध्यक्ष पेन्स यांच्यावर सोपवला आहे. या आधी त्यांनी एकदाच अंतरीक्ष विषयावर भाष्य करताना आपण नासाचे बजेट आणखी 1.6 अब्ज डॉलर्सने वाढवत आहोत असे म्हटले होते. त्या आधारे आपण आता आणखी मोठ्या अंतरीक्ष मोहीमा काढू शकतो असे त्यांनी त्यवेळी म्हटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.