वाराणसी – प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी तुम्हाला आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यापुढे भाविकांना विशिष्ठ कपड्यांमध्येच बाबा विश्वनाथ यांचं दर्शन घेता येणार आहे. पण हा ड्रेस कोड केवळ मंदिराच्या गाभाऱ्यात स्पर्श दर्शन करणाऱ्या भक्तांसाठीच लागू असणार आहे. पुरुषांना धोतर-कुर्ता आणि महिलांना साडी परिधान करावी लागणार आहे.
तसेच मंदिरात पॅन्ट, शर्ट आणि जीन्स असे कपडे घातलेले भक्त दुरुनच दर्शन घेऊ शकतात. हा नवा ड्रेस कोड कधीपासून सुरु होणार याबाबत अद्याप कोणतीही माहितीसमोर आलेली नाही. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच हा नियम लागू करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा निर्णय काल (दि. १२) रविवारी रात्री, काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, सकाळी ११ वाजेपर्यंत भक्त, काशी विश्वनाथाचं स्पर्श दर्शन करु शकणार आहेत.