आता मंगल कार्यालयांनाही परवानगी द्या…

शिवसेनेसह व्यावसायिकांची पालिकेकडे मागणी

पुणे- शहर आणि जिल्ह्यातील मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, सभागृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.

 

शहर व जिल्ह्यात जवळपास 500 कार्यालय, हॉल, सभागृह आहेत. या व्यवसायावर वाढपी, आचारी, वाजंत्री, फुलवाले, सजावटकार, रोजंदारी कामगार, पारंपारिक वादक अशा शेकडो व्यावसायिक व कामगारांचा रोजगार अवलंबून आहे. या लोकांचे हातावरचे पोट असल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. सद्यस्थितीत सरकारने जिम, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल यांना 50 टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

 

त्याच धर्तीवर ही परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, माजी नगरसेवक प्रशांत बधे, योगेश मोकाटे, शंकर बेलदरे, सुनील महाजन, तसेच असोसिएशनचे सुरेश शर्मा, किशोर सरपोतदार, अरुणा ढोबळे, श्रीपाल ओसवाल, कुणाल बेलदरे, सचिन चव्हाण, मोहित पिंगळे, परीक्षित घोडके, कौस्तुभ पिंगळे, शेखर ढमाले, संदीप रानडे यावेळी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.