मेलबर्न – ग्रॅंडस्लॅम टेनिसमधील मौसमातील पहिलीच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत सर्बियाचा जागतिक आग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीचने विजेतेपद पटकावले. त्याने या स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम लढतीत ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासचा सलग तीन सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात पहिला सेट जोकोवीचने 6-3 असा सहज जिंकला मात्र, दुसरा सेट दोन्ही खेळाडूंच्या कडव्या लढतीने गाजला.
Womens U19 T20 WorldCup | फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने-सामने; विजेतेपदासाठी लढत!
प्रत्येक गुणांना पारडे फिरत होते. टायब्रेकमध्ये जोकोवीचने अनुभव पणाला लावला व हा सेट 7-6 (7-4) असा जिंकत आघाडी वाढवली. तिसरा सेटही अत्यंत रोमहर्षक ठरला. 6-6 अशी बरोबरी झाल्यावर पुन्हा एकदा टाब्रेकमध्ये हा लढ रंगला. अखेर त्सित्सिपासने सर्व्हिस गमावली व जोकोवीचने हा सेटही 7-6 (7-5) असा जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. खरेतर या सामन्याच्या समिक्षणापेक्षा यंदाच्या या स्पर्धेत विजेतेपद मिळवायचेच या इराद्याने उतरलेल्या जोकोवीचच्या खेळाचेच वर्णन केले पाहीजे.
ज्या देशाने गेल्या मौसमात अत्यंत अपमान केला त्याच देशात नाकावर टीच्चून जोकोवीचने हे विजेतेपद पटकावले. विजय मिळवल्यावरही त्याला आपल्या भावना लपवता आल्या नाहीत. गेल्या स्पर्धेपूर्वी करोनाची लस घेण्यास नकार देत ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेल्या जोकोवीचला अत्यंत अपमानाला सामोरे जावे लागले होते. व्हिसासाठी सादर केलेल्या कागदपत्रात त्रुटी असल्याचे दाखवत त्याला निर्वासितांच्या छावणीत काही दिवस ठेवले गेले.
त्याला स्पर्धेत प्रवेश नाकारतानाच अत्यंत अपमानास्पद वागणूकही दिली गेली. मात्र, हे सर्व केवळ मनात ठेवत तो मेलबर्नमध्ये दाखल झाला ते विजेतेपद मिळवायचेच याच इराद्याने व त्याने ते सिद्धही केले. विजेतेपदानंतर आपल्या कुटुंबीय तसेच प्रशिक्षकांसह तो अक्षःरश ढसा ढसा रडला. त्याला आश्रु लपवता आले नाहीत. इतरवेळी कोणती स्पर्धा जिंकल्यावर आपली रॅकेट तेथेच उपस्थित असलेल्या एखाद्या लहान मुलाला देणारा जोकोवीच यावेळी खूपच बावनाविवश बनलेला जगाला दिसला.
His night. His court. His trophy. His legacy.@DjokerNole • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/1tC4Foanm1
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023