मुंबई – बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘राम लखन’ने जॅकी श्रॉफच्या कारकिर्दीला उंच भरारी दिली. या चित्रपटात रामची भूमिका जॅकीला कशी मिळाली यांची चर्चा सध्या सोशलवर होत आहे. 1989 मध्ये आलेला सुभाष घई यांचा ‘राम लखन’ चित्रपट याने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले.
या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर धमाल केली, तर जॅकी दादा आणि अनिल कपूर यांच्या करिअरलाही जबरदस्त उंच भरारी मिळली. सुभाष घई यांना चित्रपटातील रामच्या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेत्याला घ्यायचे होते. या चित्रपटात जॅकीने अनिल कपूरच्या भावाची आणि दबंग पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. हे पात्र साकारून जॅकी दादा रातोरात बड्या स्टार्सच्या पंक्तीत सामील झाला होता. पण एका रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी जॅकी हे पहिली पसंती नव्हते.
सुभाष घई यांना या चित्रपटात रामाच्या भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना कास्ट करायचे होते. चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत शत्रुघ्न सिन्हा आणि सुभाष घई यांच्यात बोलणेही झाले होते, पण गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत आणि भूमिका जॅकी दादाकडे गेली. त्यानंतर रामच्या भूमिकेत उत्तम अभिनय आणि दमदार परफॉर्मेंसने हे पात्र जॅकीदादाने जिवंत केले.
90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ‘राम लखन’ जॅकी आणि अनिल तसेच माधुरी दीक्षितच्या करिअरचा टर्निंग पॉइंट देखील होता. गुलशन ग्रोव्हरलाही या चित्रपटातून ग्रे कॅरेक्टर्समध्ये चांगली ओळख मिळाली. या चित्रपटात गुलशन ग्रोवरचा डायलॉग तकिया कलाम बॅडमन आजही खूप लोकप्रिय आहे. या चित्रपटातील गाण्यांनी सुपरहिटचे अनेक रेकॉर्डही मोडले.