मुंबई – अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची ‘द मॅजिक ऑफ शेरी’ ही वेबसिरीज आता पुढे ढकलण्यात आली आहे. जिओ सिनेमावर येणारी ही मालिका आज म्हणजेच १३ जुलैला येणार होती, पण आता निर्मात्यांनी या वेब सिरीजची डेट पुढे ढकलली आहे. या मालिकेच्या ट्रेलरमध्ये श्रीचा नवरा कुणालाही न सांगता पळून जाताना आणि जैन समाजाची दीक्षा स्वीकारताना दाखवण्यात आला असून या सीनवरून जैन समाजाचा विरोध दर्शवण्यात आला आहे.
आचार्य तीर्थभद्र सुरेश्वर जी महाराज यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना की, “‘द मॅजिक ऑफ शेरी’ मालिकेचा ट्रेलर पाहिल्यानंतर, आम्ही असे म्हणू शकतो की, ही मालिका जैन धर्माच्या श्रद्धांचे पूर्णपणे उल्लंघन करत आहे, तसेच ही मालिका दिशाभूल करत आहे. धार्मिक प्रथा, ज्या कोणत्याही जैनांना मान्य नाहीत. आमच्या समस्यांबाबत आम्ही अनेक सरकारी अधिकाऱ्यांना पत्रे लिहिली होती. या मालिकेचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आम्हाला आनंद आहे.’
अशात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच निर्माते ही मालिका पुन्हा एकदा एडिट करतील आणि त्यानंतर ही मालिका OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर प्रसारित केली जाईल, जिथे या मालिकेमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घेतली जाईल.