पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी अयोध्येतील राम जन्मभूमी येथे श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी अनेक बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली होती. अशात जॅकी श्रॉफ आणि विवेक ओबेरॉय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ विवेकने सोहळा मीडियावर शेअर केली आहे. यात हे दोन्ही कलाकार अनवाणी पायाने राम मंदिरात पोहोचले आहे. विवेकनेदादासोबतचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना त्यांचे आवडते म्हणत आहेत. त्यानंतर ते एकत्र जय श्री राम म्हणत जयघोष करत आहे. दोघांनीही हसत हसत कॅमेरासमोर पोज दिली. मग विवेक जॅकीदादाचे पायाकडे बोट कॅमेरा फिरवत आहे.
विवेक ओबेरॉय म्हणतो,’दादाने अजिबात बूट घातलेले नाहीत.” हे ऐकून जॅकीदादा हसायला लागतात आणि पुढे जाऊ लागतात. विवेकही कॅमेऱ्यावर लक्ष केंद्रित करत पुढे जात म्हणतो,’रामाच्या भूमीत आलात तर बूटांची गरज नाही.’ जॅकीदादाच्या या व्हिडिओ चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलताना, विवेक ओबेरॉयने नुकत्याच रिलीज झालेल्या रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स फर्स्ट वेब सीरिज ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. लोक त्याच्या कामगिरीचे कौतुक करत आहेत.तर जॅकी श्रॉफचा मस्ती में रहे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘सिंघम अगेन’मध्येही ते दिसणार आहे.