मुंबई – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी कामगारांना सोनू सूदने आपापल्या प्रांतात परतण्यासाठी वाहनांची सोय करून दिली होती. त्याने विदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना मदतही केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यापासून ते ऑपरेशनसाठी लागणारा वैद्यकीय खर्च करेपर्यंत सर्व गरजवंतांची गरज सोनू सूदने या काळात पूर्ण केली. सोनू अजूनही न थांबता लोकांची मदत करत आहे.
आता, सोनू सूद देशाचे भविष्य उत्तम बनविण्याच्या दिशेने काम करत आहे. ज्या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे. अश्या विद्यार्थ्यांच्या मदतीला सोनू धावून गेला आहे. सोनूने ऑनलाईन क्लासेससाठी मुलांना मोबाईल फोन देण्याचे ठरवले आहे. ज्या मुलांना फोन स्मार्ट फोन खरेदी करता येणार नाहीत, त्यांना हे मोबाईल देण्यात येतील. स्वत: सोनूने याबाबत माहिती दिली आहे.
No student will miss their education..
Sending phones for everyone.@SoodFoundation https://t.co/mAzVMgGkad— sonu sood (@SonuSood) March 10, 2021
एका शिक्षण संस्थेने ट्विट करून सोनू सूदकडे मदत मागितली होती. मुलांच्या शिक्षणामध्ये अडचण येऊ नये, म्हणून त्यांनी मुलांसाठी मोबाईल फोनची मागणी केली. त्यांच्या या विनंतीला मान देत सोनूने त्यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. सोनू म्हणाला की, “कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आपल्या सर्वांना फोन पाठवत आहे.’ सोनू सूदच्या या ट्विटनंतर प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे.
यापूर्वी सुद्धा कोपरगाव नगरपालिकेच्या शाळेमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सोनू सूदने शंभर विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांचे मोबाईलचे वाटप केले होते.