लखनौ – महिलांविरोधात गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीला अटकपूर्व जामीन नाकारणारे विधेयक उत्तर प्रदेश विधानसभेत आज मंजुर करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने हे विधेयक मांडण्यात आले होते. त्यानुसार महिलांच्या विरोधात कोणतीही दयामाया दाखवली न जाण्याचा निर्धार सरकारने याद्वारे व्यक्त केला आहे.
बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील अर्थात पोक्सोच्या आरोपींनाही हा जामीन नाकारण्यात आला आहे. बलात्कार, सामूहिक बलात्कार, लैंगिक गैरवर्तणूक आदी प्रकरणातील आरोपींना आता असा जामीन मिळणार नसल्याचे या विधेयक संमतीनंतर स्पष्ट झाले आहे.