वॉशिंग्टन: इराण-अमेरिकेच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज राष्ट्राला संबोधित केले . इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेचे कोणत्याही नुकसान झाले नाही असे ते म्हणाले.
US President Trump: No Americans were harmed in last night's attack by the Iranian regime. We suffered no casualties. All our soldiers are safe, only minimal damages were sustained at our military bases. https://t.co/5dW17stxwk
— ANI (@ANI) January 8, 2020
काल झालेल्या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. अमेरिकेचे सर्व सैनिक सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. सैनिकी स्थळांना काही प्रमाणात नुकसान झाले परंतु कोणत्याही इराकी आणि अमेरिकन नागरिकांना इजा झालेली नाही.
ट्रम्प म्हणाले, कासिम सुलेमानी यांनी हिज्बुल्लाला वाढवले. त्यामुळे हजारो अमेरिकन सैनिकांना प्राण गमवावे लागले आहे . लष्करप्रमुख सुलेमानी दहशतवादी असल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्यात इराणच्या लष्करप्रमुखांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी त्यांच्या अंत्यसंकरावेळी सुमारे दहा लाख लोक जमले होते.